ठाणे : आजच्या उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आधी शिंदे गटाकडून आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला बाळासाहेबांची शिवसेना कार्यालय असा नावाचा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना आनंद आश्रमाला भेट देता आली नाही. दौरा सुरू असताना आनंद आश्रमात शिंदे गटाचे ठाण्यातील काही नेतेही उपस्थित होते. त्यामुळे वाद होण्याची शक्याता होती त्यामुळे पोलिसांनी याबाबत माहिती उध्दव ठाकरे यांना माहिती दिली होती. वाद टाळण्यासाठी उध्दव ठाकरे यानी पोलिसांच्या विनंतीला मान देत निथे न जाण्याचा निर्णय घेतला.
तगडा बंदोबस्त : मागील अनेक दिवसांच्या वादाचा अंदाज आल्याने ठाणे पोलिसांनी सुरवातीपासून या दौऱ्याला मोठा बंदोबस्त लावला होता. शिवाजी मैदानात असलेल्या आरोग्य शिबिराच्या ठिकाणापासून ते जैन मंदिरापर्यंत ठाणे पोलीस, राज्य राखील दलाच्या तुकड्या बंदोबस्ताला तैनात ठेवल्या होत्या. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
लवकरच घेणार समाचार :महविकास आघाडीचे सरकार शिवसेनेच्या बंडामुळे कोसळले होते. या प्रकाराला सहा महिने झाल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे ठाण्यात आले होते. या आधी टेंभी नाक्याच्या देवीला भेट देण्यासाठी रश्मी ठाकरे आल्या होत्या. आदित्य ठाकरे हे देखील ठाण्यात येवून गेले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, या बंडामुळे महाराष्ट्राची नाचक्की देशभरात झाली आहे. जाहीर सभा घेवून याचा समाचार घेतला जाईल.