महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime: चांदीच्या गदेसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास करणाऱ्या दोन चोरट्याला भिवंडीतून अटक - दोन चोरट्याला भिवंडीतून अटक

कल्याण पश्चिम भागातील घोडेखोत आळीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील चांदीची गदा, दान पेटीतील रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास करणाऱ्या, चोरट्याला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासातच सापळा रचून अटक केली आहे. साकीब उर्फ सलमान मोहंम्मद अख्तर अंसारी (वय २४ रा. जब्बार कम्पाऊन्ड, भिवंडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

Thane Crime
चोरटा भिवंडीतून अटक

By

Published : Jul 26, 2023, 9:51 PM IST

माहिती देताना निलेश सोनवणे

ठाणे: दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे कल्याण पश्चिम भागातील घोडेखोत आळीत आहे. या मंदिरात २४ जुलै रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने मंदिराची लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिर गाभाऱ्याच्या आतील लाकडी दरवाजाची कडी तोडून हनुमानाची सव्वा किलो वजनाची चांदीची गदा तसेच चांदीचा मुकुट चोरला. त्याचबरोबर चांदीचे छत्र, चांदीचा रुईचे पानांचा हार, पितळी टोला, टाळ, दान पेटीतील ६ हजार ४७० रुपयाची रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला. २५ जुलै रोजी नेहमी प्रमाणे सकाळी मंदिर उघडले असता, मंदिरात चोरी झाल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला.



१०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला : चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून स्थानिक पोलीस पथकासह भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास केला. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, चोरी करणारा चोर भिवंडीतील शांतीनगर भागातील जब्बार कंपाऊंडमध्ये राहत होता. त्यावेळी जब्बार कंपाऊंड मधील एका खोली नजीक सापळा रचून साकीब उर्फ सलमान याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून लंपास केलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या चोरट्याला आज भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसानी अटक करून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात चोरटा साकीब उर्फ सलमानला हजर केले असता, अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच चोरट्याने आणखी किती ठिकाणी घरफोड्या केल्या याचाही तपास बाजारपेठ पोलिसांनी सुरू केला आहे.


एक लाखांची केली फसवणूक : दरम्यान भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी दोन गुन्ह्याची उकल केली आहे. भिवंडी शहरात सोन्याचे नकली दागिने दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याला कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ जुलै रोजी सापळ रचून जेरबंद केले आहे. अजय यजुभाई वाघेला (वय २३ ) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव असून त्याने २ जुलै रोजी भिवंडीत राहणाऱ्या हिना खान या महिलेला नकली दागिने देऊन एक लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी ३ जुलै रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या भामट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.



४२ मोबाईल फोन केले हस्तगत : भिवंडी शहरातून चोरीस गेलेले व हरवलेले नागरिकांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ४२ मोबाईल फोन हस्तगत करून, ते संबधित मोबाईल मालकांना परत दिले आहे. तांत्रिक बाबीच्या आधारे शोध घेतले ४२ मोबाईल एकूण ५, लाख ७९ हजार रुपये किंमतीचे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली. या तिन्ही गुन्ह्याची उकल करण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकातील पो.नि. विजय मोरे, स.पो.नि. प्रफुल्ल जाधव धनराज केदार, पो. उ. नि. हनुमंत वाघमारे, रविंद्र पाटील, पो.हवा. सचिन साळवी, मंगेश शिर्के, पो. ना. सचिन जाधव, पो.शि. जाधव , प्रशांत बर्वे, भावेश घरत, अमोल इंगळे, रविंद्र साळुंखे, म.पो.हवा माया डोंगरे, श्रेया खताळ यांनी केली आहे.


हेही वाचा -

  1. Robbers Gang Arrested In Thane : दरोडा टाकण्याआधीच सहा दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक
  2. Bangladeshi Arrested In Kalyan : कल्याण एसटी डेपो परिसरातून ५ बांगलादेशी महिलांसह भारतीय नागरिकालाही अटक

ABOUT THE AUTHOR

...view details