महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना : अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने ठाणे शहराचे होणार निर्जंतुकीकरण

निर्जंतुकीकरणाची फवारणी प्रभावीपणे करता यावी, यासाठी ठाणे महापालिकेने अहमदाबादवरून दोन अत्याधुनिक वाहने मागवली आली आहेत. या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी 40 फुटांच्या रस्त्यावर फवारणी करता येऊ शकते.

sophisticated machine import from ahmadabad for Sterilization
ठाणे शहराचे अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने होणार निर्जंतुकीकरण

By

Published : Mar 29, 2020, 9:54 PM IST

ठाणे -शहरामध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी प्रभावीपणे करता यावी, यासाठी महापालिकेने अहमदाबादवरून दोन अत्याधुनिक वाहने मागविण्यात आली असून आता महापालिकेच्या ताफ्यात असलेल्या यंत्रणेबरोबरच या वाहनाच्या साहाय्याने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे. या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी 40 फुटांच्या रस्त्यावर फवारणी करता येऊ शकते.

ठाणे शहराचे अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने होणार निर्जंतुकीकरण

वाहनाची गतीही पाच मिनिटाला एक किमी एवढी असल्याने जास्तीत जास्त क्षेत्रफळामध्ये फवारणी करता येणार आहे. ही दोन वाहने शहराच्या विविध भागामध्ये फवारणी करतील. त्याचबरोबर या वाहनांसोबत 10 ट्रॅक्टर्स, 10 टँकर्स, 10 बोलेरो, 5 टाटा एस आणि 125 हातपंपाच्या माध्यमातूनही फवारणी करण्यात येत आहे. शहरातील मोठ्या रस्त्यांवर या वाहनांच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येणार असून छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून छोट्या वाहनांच्या माध्यमातून फवारणी करण्यात येत असल्याचे, महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details