महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबरनाथ शहरातील 'त्या' कोरोनाग्रस्त मृत्यू रुग्णाचे २ नातेवाईक पॉझिटिव्ह - कोरोनाग्रस्त बातमी

अंबरनाथ शहरातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. त्यांच्या 2 नातेवाईकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण, ते पूर्वीच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Apr 11, 2020, 8:33 PM IST

Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

अंबरनाथ (ठाणे) - अंबरनाथ शहरातील कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या त्या 50 वर्षीय व्यक्तीच्या 2 नातेवाईकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. मात्र, सुदैवाने हे दोन्ही रुग्ण ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईच्या भाभा रुग्णालयात उपचारादरम्यान एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तिच्या सहवासात असलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, त्या व्यक्तीच्या पत्नीचा व मुलाची कोरोनाची तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. तर दूसरा मुलगा, दोन पुतणे यांचा कोरोना तपासणीचा अहवाल प्रतिक्षेत होता. यातील दोघांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून या तिघांपैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मृत व्यक्ती 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशला एका कार्यक्रमानिमित्त गेला होता. तिथून तो 18 मार्चला अंबरनाथला आला. त्यानंतर या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्यांनी अंबरनाथ येथील दोन खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र, तात्पुरते बरे वाटल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे मुंबईच्या केईएम रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. इथे उपचार सुरू असताना त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली असता 2 एप्रिल रोजीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला मुंबईच्या भाभा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, रुग्णालयात त्या व्यक्तिसोबत असलेल्या पत्नी व मुलाचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह तर दूसरा मुलगा, दोन पुतणे यांचा कोरोना तपासणीचा अहवाल प्रतिक्षेत होता. आज मात्र या तिघांपैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन्ही नातेवाईक यापूर्वीच ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल आहेत.

हेही वाचा -धक्कादायक..! कॅन्सरग्रस्त बापासह आईला घेऊन मुलाने दुचाकीवरून केला जीवघेणा प्रवास

Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details