महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात रूग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - कंपाउंडर

या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून याबाबत नारपोली पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना (आयसीयू) अतिदक्षता विभागात प्रवेश करु न दिल्यामुळे ही घटना घडली.

रूग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

By

Published : Aug 1, 2019, 11:18 PM IST

ठाणे- स्व. काशिनाथ पाटील रूग्णालयामध्ये रुग्णाने नातेवाईकांच्या मदतीने डॉक्टर दाम्पत्य, कंपाउंडर, परिचारिका, मॅनेजर, मेडिकल चालक आदींना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच त्यांनी रुग्णालयाची तोडफोडही केली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून याबाबत नारपोली पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना (आयसीयू) अतिदक्षता विभागात प्रवेश करु न दिल्यामुळे ही घटना घडली.

रूग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी की, मुस्तफा शेख याच्या छातीवर ब्लेडने वार झाल्यामुळे त्याला भिवंडीतील स्व. काशिनाथ पाटील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या घटनेबाबत नारपोली पोलीस ठाण्यात डॉ. शाहीद खान यांनी माहिती देऊन रुग्णावर उपचार सुरू केले होते. यावेळी रुग्णाची पत्नी आस्मा शेख व त्याचे नातेवाईक सतत आयसीयूमध्ये ये-जा करत होते. त्यामुळे खान यांनी तुमच्यामुळे रूग्णाला त्रास होत आहे. तुम्ही आयसीयूमधून बाहेर जा, असे सांगतिले. तेव्हा रूग्णाच्या नातेवाईकाने अतिदक्षाता विभागातच गोंधळ घातला. तसेच मशीनची व बाहेरील अन्य सामानासह फर्निचरची तोडफोड करत डॉ. शाहीद खान व त्यांची पत्नी डॉ.स्वाती खान, मॅनेजर कैलास म्हात्रे, डॉ. दिनेश पाटील तसेच मेडिकल चालक तय्यब शेख व परिचारिकेला मारहाण केली.

त्यानंतर रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी रूग्णालयाचे बिल न देताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या मागे रूग्णालयातील कर्मचारी विठोबा पाटील गेले असता त्यांनादेखील जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुस्तफा व त्याची पत्नी आसमा या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details