महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक - case

१० वीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक

By

Published : Mar 23, 2019, 11:44 PM IST

ठाणे- १० वीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांची शालांतपरीक्षा सुरु असताना१५ मार्चचा विज्ञान-१ व १७ मार्चचाविज्ञान-२ तसेच २० मार्चचासमाजशास्त्र, अशा ३ प्रश्नपत्रिका फुटल्याच्या भिवंडी शहरातवेगवेगळ्याघटना समोर होत्या.

याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी यापूर्वीचवजीर हफिजूर रहेमान शेख (४० रा. वेताळपाडा ) याला केली आहे. तर आज इंतेकाब निषाद पटेल (३२) आणि अंबर अफरोज अन्सारी (२९) याला अटक केली आहे. अटक केलेल्या शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांची संख्या आता तीनवर गेली आहे.

दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी २ शिक्षकांना अटक

३ पेपर फुटीप्रकरणी भिवंडी शहर व नारपोली पोलीस ठाण्यात २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. भिवंडी शहर पोलिसांनी यापूर्वीचवजीर हफिजूर रहेमान शेख, याकोचिंग क्लास शिक्षकाला अटक केली आहे. आज अंबर अफरोज अन्सारी यालाही अटक केली आहे. तर नारपोली पोलिसांनी शनिवारी महापोली येथील इंतेकाब निषाद पटेल यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या तिघांनी कोचिंग क्लासच्या माध्यमातून ३ विद्यार्थिनींना मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपद्वारे समाजशास्त्रविषयाची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, यातील ३ विद्यार्थिनींवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details