ठाणे -शहरामध्ये कामानिमित्त ये-जा करणारे अनेकजण लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करीत असतात. अशातच रेल्वे मार्गात दबा धरुन बसलेले भुरटे चोर पाकीट व मोबाईलची चोरी करतात. चतुराईने चोरी करणाऱ्या फटका गॅंगच्या दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 56 हजार 700 रुपयांचे पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. एकूण सहा गुन्ह्यांची उकल करण्यात ठाणे लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.
लोकलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या 'फटका गँग'चे दोन सदस्य जेरंबद हेही वाचा -
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी (लोकल) गाड्यांमधून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करीत असतात. लोकल रेल्वेत नेहमीच गर्दी असते. त्यामुळे लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यावर फटका गॅंगचे विशेष लक्ष असते. रुळांलगतच्या खांबावर चढून किंवा रुळांशेजारी लपून बसून लोकल गाड्यांच्या दारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल लंपास करण्यामध्ये ही भुरटी फटका गँग सक्रिय असते. ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हाती या गँगचे दोन सदस्य लागले असून, हुसेन हनिफ शहा (वय-24, रा.काशिमीरा) आणि दानिश सालम शेख (रा.काशिमीरा) या दोघांना अटक केली आहे.
आरोपींकडून चोरीचे मोबाईल खरेदी करणारे बिलाल खान (वय-24) (रा.काशिमीरा) आणि मोहम्मद अस्लम सय्यद (वय-32, रा. अंधेरी) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या चोरटयांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा गुन्हे केल्याची कबुली दिली असून, आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा -