ठाणे - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून रग्गड पैसा कमवण्याचे आमिष एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका व्यक्तीला तब्बल २ लाख १६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ठाण्यात शेअर मार्केटद्वारे पैसे दुप्पट करणे पडले महाग; २ लाखांचा गंडा - ठाणे
तक्रारदार व्यक्तीला तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवून दामदुप्पट करून देतो, असे सांगणारा फोन आला. त्यांनी या आमिषाला बळी पडत थोडे-थोडे करून जवळपास २ लाख १६ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, कालांतराने फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तक्रारदार व्यक्तीला तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवून दामदुप्पट करून देतो, असे सांगणारा फोन आला. त्यांनी या आमिषाला बळी पडत थोडे-थोडे करून जवळपास २ लाख १६ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, कालांतराने फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार कळवा पोलिसांनी तांत्रिकरितीने तापस करीत मध्यप्रदेशातून अरविंद चव्हाण आणि ऋषिकेश शर्मा यांना अटक केली.
दोन्ही आरोपी मध्यप्रदेशात एक बनावट कॉल सेंटर चालवत होते. त्याद्वारे नागरिकांना शेअरमार्केटच्या भूलथापा देत त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. या दोन्ही आरोपींनी अनेक नागरिकांना जवळपास १ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपींना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली असून पोलीस पुन्हा एकदा वाढीव पोलीस कोठडी देऊन तपास करणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.