महाराष्ट्र

maharashtra

Thane News : बिडी ओढत काम करणे बेतले जीवावर, स्फोटात दोघे जागीच ठार

By

Published : Feb 1, 2023, 2:35 PM IST

Updated : Feb 1, 2023, 10:11 PM IST

बिडी ओढत भंगार गोदामात काम करणे दोन जणांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. मृतांमधील एक जण बिडी ओढत असतानाच बिडीची ठिणगी केमिकल ड्रममध्ये पडताच जबरदस्त स्फोट होऊन या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Thane News
बिडी ओढत काम करणे बेतले जीवावर,

बिडी ओढत काम करणे बेतले जीवावर,

ठाणे : बिडीची ठिणगी केमिकल ड्रममध्ये पडताच जबरदस्त स्फोट झाल्याची घटना भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागातील भंगार गोदामात घडली आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात लहान मोठ्या भीषण आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी ज्वालामुखीचा तालुका अशी ओळख भिवंडी तालुक्याची निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे २०० हून अधिक आगीच्या घटना घडल्याच्या भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयातील नोंदीवरून उघडकीस आले आहे. अग्नी तांडवच्या दुर्घटनेत रमजान कुरेशी (वय 46) व ईशराईल शेख (वय 35) असे जागीच ठार झालेल्याची नावे आहेत.



आगीवर नियंत्रण :भंगार गोडाऊनमध्ये केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम आज सकळाच्या सुमारास दोघे कामगार करीत होते. त्यातच एक जनाला बिडी ओढण्याची तलप निर्माण झाली. बिडी ओढत केमीकल ड्रमची साफसफाई करत असतानाच बिडीची ठीणगी त्या केमीकल ड्रममध्ये पडल्याने ड्रामाचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडकीच्या काचा देखील फुटल्या. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दल व निजामपूर पोलीस दाखल असून स्फोटामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत पंचनामा करीत आहेत.


लाखोंच्या संख्येने ग्रामीण भागात गोदामे :भिवंडी शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रमाग कारखान्यांसह कापड साठवलेल्या गोदामांना तसेच डाईंग साइजिंगला आगी लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. शहरालगतच्या ग्रामीण भागात गोदामे लाखोंच्या संख्येने आहेत. या मधील काही गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल गोदामांसह भंगार व इतर साहित्याच्या गोदामांना आगी लागण्याच्या घटना नियमित घडत असतात.


भंगाराची गोदामे सर्वाधिक खाक :भिवंडीत लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये सर्वाधिक भंगाराची गोदामे जळून खाक होतात. केमिकल व यंत्रमाग कारखान्यांना आगी लागल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडतात. यापूर्वीही तत्कालीन मंत्री रामदास कदम यांना भिवंडीतील गोदाम पट्यातील अनेक ठिकाणच्या गोदामात बेकादेशीर घातक रसायनांचा साठा आढळून आला होता. त्यांनी त्यावेळी २० ते २५ घातक रसायनांचासाठा करणारी गोदामे सील करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. तरी देखील आजही काही ठिकाणी छुप्या रित्या घातक रसायनांचासाठा साठवून केली जात असल्याची माहिती अनेक वेळा पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत उघड झाली आहे.





हेही वाचा :Budget 2023 : ७ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार - अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा

Last Updated : Feb 1, 2023, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details