महाराष्ट्र

maharashtra

मीरा भाईंदरमध्ये गुरुवारी २०४ कोरोनाबाधितांची नोंद; एकूण रुग्णसंख्या ८१८७ वर

By

Published : Jul 31, 2020, 10:49 AM IST

मीरा भाईंदर कोरोनाबधितांच्या रुग्णसंख्येने ८ हजारांचा टप्पा पार केला आहे. दिवसभरात २०४ रुग्ण वाढले आहेत. २५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ८१८७ वर पोहोचली आहे.

Mira Bhayandar Corona update
मीरा भाईंदर कोरोना अपडेट

मीरा भाईंदर(ठाणे)- मीरा भाईंदर शहरात गुरुवारी २०४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे येथील कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांवर पोहोचला आहे. गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये मिरारोड परिसरात १०६, भाईंदर पूर्व भागात ५८ तर भाईंदर पश्चिममधील ४० रुग्णांचा समावेश आहे. मीरा भाईंदरमधील एकूण रुग्णसंख्या ८ हजार १८७ झाली.

मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनामुक्तांची संख्या दिलासादायक आहे. दिवसभरात २५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण कोरोनामुक्तांची संख्या ६ हजार ३५२ झाली आहे.कोरोनामुळे दिवसभरात ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मीरा भाईंदर शहरात एकूण आतापर्यंत २७० जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २४ हजार ८२९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १५ हजार ६५२ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्काह आला आहे. अद्याप ९९० जणांचा वैद्यकीय अहवाल प्रतिक्षेत आहे. सध्या १ हजार ५६५ जणांवर मीरा भाईंदर शहरातील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, राज्यात गुरुवारी ११ हजार १४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४ लाख ११ हजार ७९८ झाली आहे. गुरुवारी दिवसभरात ८ हजार ८६० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात एकूण १ लाख ४८ हजार १५० अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details