ठाणे- व्हॉट्सअप मेसेजवरून दोघांमध्ये वाद झाल्याने त्या वादातून कापड दुकानाची तोडफोड केल्याची घटना भिवंडीतील दिवांशाह दर्गारोड येथे घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात 18 जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॉट्सअपच्या वादातून कापड दुकानाची तोडफोड, १८ जणांविरोधात गुन्हा दाखल
व्हॉट्सअप मेसेजवरून दोघांमध्ये वाद झाल्याने त्या वादातून कापड दुकानाची तोडफोड केल्याची घटना भिवंडीतील दिवांशाह दर्गारोड येथे घडली आहे.
खालीद सैय्यद आणि ताविश अन्सारी या दोघांमध्ये व्हॉट्सऍप मेसेजवरून क्षुल्लक वाद झाला होता. या वादाचे भांडणात रूपांतर होऊन तावीश याने त्याचे साथीदार मिराज अन्सारी, अरिश अन्सारी, शेरू अन्सारी, रियाज शेख, रेहान मोमीन व 10 ते 12 साथीदारांच्या मदतीने नौशाद सैय्यद याच्या दर्गारोड रोड येथील कापडाच्या दुकानाची तोडफोड आणि नुकसान केले. रमजान महिन्यानिमित्त सैयदने दर्गारोड येथे तात्पुरत्या स्वरूपाचे कापडाचे दुकान चालू केले होते.
त्याबरोबरच इरफान अन्सारी याने येथे पानटपरी चालू केली होती. त्यालाही पानटपरी व चायनीज दुकान लावण्यास मनाई करत ताविशने मारहाण केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय सचिन बाराते अधिक तपास करत आहेत.