ठाणेSame Sex Marriage : 26 वर्षीय मुलीच्या वडिलांनी मानपाडा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. विशेष म्हणजे ही तरुणी तिच्या 27 वर्षीय मैत्रिणीसोबत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. शिवाय दोघींचे समलैंगिक संबंध असल्यानं त्यांनी लग्न केल्याचा संशय आहे.
मैत्रिणीसोबत मुलगी बेपत्ता : मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता मुलीचे वडील हे कल्याण शीळ रोडवरील एका गावात कुटुंबासह राहतात. त्यांच्या बेपत्ता झालेल्या मुलीनं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. याशिवाय डोंबिवलीत राहणारी तिची 27 वर्षीय मैत्रिण गेल्या काही महिन्यांपासून पिसवली येथील तिच्या घरी येत होती. दोघींची घट्ट मैत्री असल्यानं तक्रारदाराच्या वडिलांनी तिच्या कुटुंबातील समस्या सांगून त्यांचा विश्वास संपादन केल्याचं फिर्यादीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
मुलगी हरवल्याची तक्रार : बेपत्ता मलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीची मैत्रीण आमच्या घरी यायची, तासनतास ती आमच्याच घरी राहायची. माझ्या मुलीनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळं आम्ही तिच्या लग्नाची तयारी करत होतो. तसंच तिच्यासाठी मुलगा शोधत होतो. मात्र, अचानक दोन महिन्यांपूर्वी माझी मुलगी काहीही न बोलता घरातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळं मी 4 जुलै 2023 रोजी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये 26 वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार केल्याचं तिच्या वडीलांनी सांगितलं.