महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कसाराजवळ मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले, 'या' गाड्यांच्या मार्गात बदल

Train Derailed : कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले. यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

train
train

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 8:14 PM IST

Updated : Dec 10, 2023, 9:46 PM IST

ठाणे Train Derailed : कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे नाशिककडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रेल्वे अपघातामुळे कसारा-इगतपुरी सेक्शनवर गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. याशिवाय इतर कोणत्याही मार्गावर रेल्वेच्या कामकाजावर परिणाम झालेला नाही. मध्य रेल्वेच्या सीपीआरओनं ही माहिती दिली आहे.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम : कसारा स्टेशनजवळ रविवारी (१० डिसेंबर) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि सीएसएमटी या प्रवासी रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेनंतर हावडा एक्स्प्रेस आणि नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा येथेच थांबवण्यात आल्या आहे. या सोबतच इगतपुरी ते कसारा यूपी विभागातील गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. या मार्गावर अजूनही गाड्या सुरू आहेत.

वळवण्यात आलेल्या गाड्या :

१) १७६१२ सीएसएमटी नांदेड एक्स्प्रेस : कल्याण-कर्जत-पुणे-दौंड-लातूर मार्गे वळवली

२) १२१०५ सीएसएमटी गोंदिया एक्स्प्रेस : कल्याण-पुणे-दौंड-मनमाड मार्गे वळवली

३) १२१३७ सीएसएमटी फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेस : दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे वळविण्यात आली

४) १२२८९ सीएसएमटी नागपूर दुरांतो एक्स्प्रेस : दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे वळविण्यात आली

५) १२१११ सीएसएमटी अमरावती एक्स्प्रेस : कल्याण-पुणे-दौंड-मनमाड मार्गे

६) १२८०९ सीएसएमटी हावडा एक्स्प्रेस : दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे

७) १७०५७ सीएसएमटी सिकंदराबाद एक्स्प्रेस : कल्याण- कर्जत- पुणे- दौंड- मनमाड मार्गे

८) १२३२२ सीएसएमटी हावडा एक्स्प्रेस : दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे

९) १८०२९ एलटीटी शालीमार एक्स्प्रेस : दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे

१०) १२१६७ एलटीटी वाराणसी एक्स्प्रेस : दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे

११) १२१४१ एलटीटी पाटलीपुत्र एक्स्प्रेस : दिवा-वसई-उधना-जळगाव मार्गे

लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम नाही :मुंबई विभागातील डाउन मेन लाईनवरील कसारा ते TGR-3 डाउन लाईन सेक्शन दरम्यान ६.३० वाजता मालगाडी रुळावरून घसरली. मालगाडी- JNPT/DLIB कंटेनर ट्रेनच्या २ वॅगन्स रुळावरून घसरल्या. त्यामुळे कसारा ते इगतपुरी या डाऊन सेक्शनमधील मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न चालू : या अपघातानंतर तत्काळ अपघात निवारण गाडी कसारा येथे रवाना करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अपघात नियंत्रण पथक, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे प्रशासन वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अपघातात कोणतीही जिवित हानी झाल्याचं वृत्त नाही.

हे वाचलंत का :

  1. न्यू ईयरला फिरायचा प्लॅन बनवताय? मग IRCTC चे 'हे' खास टूर पॅकेजेस एकदा पाहाच
  2. राजधानी एक्सप्रेसमध्ये चोरीचे 82 मोबाईल हस्तगत; पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतलं ताब्यात
  3. पुण्याकडं येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेतील 40 प्रवाशांना विषबाधा, रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची प्रवाशी संघटनेची मागणी
Last Updated : Dec 10, 2023, 9:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details