ठाणे - पोलीस असल्याची बतावणी करत दुकलीने पादचारी नागरिकांना लुबाडण्याचा सपाटा लावला आहे. या भामट्यांनी गेल्या दहा दिवसात लागोपाठ पाच नागरिकांना गंडा घातला आहे. महात्मा फुले पोलीस चौकासह बाजारपेठ, खडकपाडा पोलिसांनी या तोतया पोलिसांविरुद्ध गुन्ह्यांच्या नोंदी केल्या आहेत.
तोतया पोलिसांचा कल्याणात धुमाकूळ; दहा दिवसात पाच जणांना लुबाडले - बाजारपेठ पोलीस
दोन तोतया पोलीस कल्याण स्थानक परिसरासह शहरातील पादचाऱ्यांना गाठून पोलीस असल्याची बतावणी करतात. व चौकशी आणि तपासणी करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून लुबाडतात. अशा घटनांच्या नोंदीने महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस वैतागले आहेत.
दोन तोतया पोलीस कल्याण स्थानक परिसरासह शहरातील पादचाऱ्यांना गाठून पोलीस असल्याची बतावणी करतात. व चौकशी आणि तपासणी करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून लुबाडतात. अशा घटनांच्या नोंदीने खडकपाडा, महात्मा फुले चौक, बाजारपेठ पोलीस पुरते हैराण झाले आहेत. दरम्यान, कल्याण पश्चिमेकडील भोईरवाडी परिसरात दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत 53 वर्षीय महिलेचे 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
भोईरवाडीच्या हेरंब अपार्टमेंटमध्ये राहणारी 53 वर्षीय महिला, रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास या परिसरातील रस्त्यावरून पायी घराकडे जात होती. दरम्यान, दोन इसम दुचाकीवरून आले आणि त्यांनी या महिलेला थांबून आम्ही पोलिस आहोत अशी बतावनी केली. यानंतर या परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असल्याचे सांगत या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. आणि रुमालाला गाठ मारून देतो असे सांगत सदर रुमाल या दुकलीने स्वतःकडे घेऊन हातचलाखीने रुमाला मधील 75 हजार रुपयाची गंठण काढून घेतले. त्यानंतर रुमाल महिलेच्या हातात घेऊन पळ काढला. रुमाल हाती पडताच त्यात गंठण नसल्याचे महिलेच्या लक्षात आले. दरम्यान, या महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार तोतया दुकली विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या वाढत्या घटनांमुळे शहरातील महिलावर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे.