ठाणे - बँकेतून २ लाख २१ हजार रुपयांची रोकड काढून बुलेटवरून घरी घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला भामट्यांनी लुबाडल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या २ भामट्यांनी त्या व्यावसायिकाला तुमचे पैसे मागे पडले, अशी थाप मारली. यामुळे बुलेटवरून खाली उतरून पैसे कुठे पडले. हे पाहण्यासाठी काही अंतरावर जाताच दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बुलेटला टांगून ठेवलेली पैशाची पिशवी पळवली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
बुलेटस्वाराला पैसे पडले सांगत भामट्यांनी पळवली 2 लाखाची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद - two wheller
भिवंडी शहरातील भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश कोंडलेकर हे सिमेंट व्यावसायिक आहेत. त्यांचे मीठपाडा खोणी येथे सिमेंट विक्रीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमाराला दुकान बंद करून ते प्रभुआळी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आपल्या खात्यातून २ लाख २१ हजार रुपयांची रक्कम काढून बाहेर निघाले.
भिवंडी शहरातील भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश कोंडलेकर हे सिमेंट व्यावसायिक आहेत. त्यांचे मीठपाडा खोणी येथे सिमेंट विक्रीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमाराला दुकान बंद करून ते प्रभुआळी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आपल्या खात्यातून २ लाख २१ हजार रुपयांची रक्कम काढून बाहेर निघाले. त्यावेळी आदर्श पार्क येथील रस्त्यावर त्यांच्या मागे बँकेतून पाळतीवर असलेल्या २ बाईकवरील चार भामट्यापैकी एका बाईकवरील दोघांनी त्यांना गाठत तुमचे मागे पैसे पडल्याचे सांगितल्याने. तत्काळ त्यांनी आपली बुलेट थांबवत रोकडची पिशवी तशीच बुलेटला अडकवून पडलेले पैसे पाहण्यासाठी माघारी चालत येत असतानाच दबा धरून बसलेल्या दुसऱ्या बाईकवरील दोघा जणांनी लगेच त्यांच्या बुलेटला अडकवलेली रोकडची पिशवी घेऊन पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निलेश कोंडलेकर यांनी तत्काळ निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक करणाऱ्या ४ भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली. आदर्श पार्क इमारतीच्या गेटवरील सीसीटीव्हीत ही संपूर्ण चोरीची घटना कैद झाली आहे. पोलीस त्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.