अल्पवयीन मुलीला धमकाविल्याप्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया भाईंदर (ठाणे):ही पीडित मुलगी १३ वर्षांची भाईंदरला राहते. १ जून पासून मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी हे दोन तरुण तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करून बोलण्याच्या प्रयत्न करत होते. १२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुन्नवर मन्सुरी (२०) याने तिला इमारतीच्या टॅरेसवर नेऊन तिचा विनयभंग केला, अशी तक्रार तिच्या आईने केली आहे. यानंतर त्यांनी या मुलीला बुरखा, चैन आणि अंगठी दिली आणि बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले. बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू असे त्या मुलीला सांगितले. मात्र पीडित मुलीने त्याला नकार दिला.
आरोपींवर पोक्सो दाखल: त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल केला नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर भाईंदर पोलिसांनी मुन्नवर अन्सारी (२०) आणि अजीम मन्सुरी (१८) या दोघांना विनयभंगच्या कलम ३५४, ३५४ (अ) ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना १७ जून पर्यंत पोलीस कोठडी:या प्रकरणाचा तपास सुरू आहे; मात्र हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने त्याबाबत अधिक माहिती देता येणार नाही. १३ वर्षांच्या तरुणीचा धर्मांतरसाठी प्रयत्न केला गेला तसेच या तरुणांनी नकली पिस्तुल वापरून तिला धमकावले आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीला धमकी: अल्पवयीन मुलीला (16 वर्षे) तिच्या पूर्वीच्या अल्पवयीन प्रियकराने तिच्यासोबत खासगीत काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडितेने आत्महत्या केल्याची घटना काल (रविवारी) रात्री मुंबईतील ना. म. जोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी या घटनेची वस्तुस्थिती जाणून घेऊन मृत मुलीच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आला आहे.
हेही वाचा:
- Mumbai Crime : मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित? विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला चार तासात अटक
- Karnataka Crime News : ऑनर किलिंग! वडील व भावाने अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केली
- Mother Beat Child : जन्मदात्या आईनेच चटके देत गरम तव्यावर बसवले, तीन भांवंडांची सुटका