महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे कॅन्टीनच्या पायाभरणीतील मृतदेहाचा पोलिसांनी लावला छडा; दोघांना अटक

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या पायाभरणीच्या कामा ठिकाणी अनोळखी व्यक्तीचा मातीत पुरलेला मृतदेह आढळला. याचा तपास कर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस
पोलीस

By

Published : Oct 12, 2020, 5:29 PM IST

ठाणे - कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) सकाळी माती काढताना येथील कामगारांना सर्वप्रथम एक मुंडके आढळून आले होते. अर्धवट अवस्थेतील या मुंडक्याचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले होते. यामुळे भयभीत झालेल्या कामगारांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

भयभीत झालेल्या कामगारांनी माहिती देल्यानंतर महात्मा फुले पोलिसांनी पायाभरणीतील माती उकरून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी या अनोळखी व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. मुकेश विठ्ठल पोरेड्डीवार (वय 45 वर्षे, रा. मुळ गडचिरोली) ,असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. तर याप्रकरणी मृतकचे सहकारी बबलु उर्फ गुलामअली बंदरे आलम खान (वय 24 वर्षे, रा. वालधुनी, कल्याण पूर्व) आणि आकीम अहमद अलीमुददीन खान (वय 24 वर्षे, रा. वालधुनी, कल्याण पूर्व) या दोघांनाही महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली.

कल्याण मधील रेल्वे कॅन्टीनच्या पायाभरणीचे काम सुरु असताना 9 ऑक्टोंबरला सकाळी माती काढताना मुकेशचे शीर मिळाले होते. घटनास्थळी महात्मा पोलीस ठाण्याचे पोलीस आल्यानंतर त्यांनी हा मृतदेह माती उकरुन बाहेर काढला होता. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. मात्र, वैद्यकीय अहवालाच्या आधारे याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर आणि निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कुंभार आणि दीपक सरोदे यांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या खूनातील मुख्य आरोपी बबलू आणि आकीम खान या दोघांनाही 11 ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास अटक केली.

मुळचा गडचिरोली जिल्ह्यातील पेठताडा (ता. चुमरसी) येथील रहिवाशी असलेला मुकेश आणि बबलू हे दोघेही कामगार असून रेल्वेच्या नविन बांधकामाच्या ठिकाणी ते मजूर म्हणून कामाला होते. जवळच असलेल्या रेल्वेच्याच क्वार्टर्समधील एका पडीक खोलीत ते राहत होते. मुकेश आणि बबलू या दोघांनाही दारुचे व्यसन होते. दोघांचीही या खोलीत राहण्यावरुन आणि जेवणावरुन नेहमी भांडणे होत होती. मुकेश त्या खोलीत आधीपासून असल्यामुळे आपणच या खोलीत राहणार तू राहू नकोस, असे त्याने बबलूला बजावले होते. त्याने बबलूला त्या खोलीत जेवणही बनवायला नकार दिला होता. यातूनच संतापलेल्या बबलूने आकीम या साथीदाराच्या मदतीने मुकेश झोपेत असतानाच त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून जवळच असलेल्या अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कोणताच धागादोरा नसतानाही महात्मा फुले चौक पोलिसांनी या क्लीष्ट खूनाचा तपास केल्याबद्दल उपायुक्त पानसरे यांनीही तपास पथकाचे अभिनंदन केले.

हेही वाचा -ठाण्यात भाजपचा मूक मोर्चा, महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा विरोध

ABOUT THE AUTHOR

...view details