ठाणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 28 जून) दिलेल्या आदेशानंतर वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी ठरवून दिलेल्या प्रवासी मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्यांना परत पाठविण्यात येत होते.
विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असल्यास घराच्या केवळ दोन किलोमीटर परिसरातच जावे, अन्यथा अशा लोकांवर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अनेकजण आपली वाहने रस्त्यावर काढत ठाण्यातून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, मुंबई व ठाणे या दोन्ही जिल्ह्याच्या पोलिसांकडून वाहनांची व कागदपत्रांची तपासणी केली जात होती. यामध्ये ठरवून दिलेल्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन त्यांना परत पाठवले जात आहे.