महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का, आणखी 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर? - shivsena councilor thane news

नवी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. घनसोली विभागातील शिवसेनेचे तीन नगरसेवक हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरू आहे. प्रशांत पाटील, सुवर्णा पाटील आणि कमलताई पाटील अशी या तीन नगरसेवकांची नावे आहेत.

नवी मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का
नवी मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का

By

Published : Mar 11, 2020, 8:38 PM IST

नवी मुंबई -शिवसेनेला नवी मुंबई महानगरपालिकेत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ३ नगरसेवक सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. प्रशांत पाटील, सुवर्णा पाटील आणि कमलताई पाटील असे या ३ नगरसेवकांची नावे आहेत. हे तिघेही घणसोली विभागातील शिवसेना नगरसेवक आहेत. त्यांनी एका लोकार्पण सोहळ्याला थेट गणेश नाईक यांना निमंत्रण दिलं आहे. तसेच घणसोली विभागात यासाठी मोठी बॅनरबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले आहे.

शिवसेनेच्या २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश व शिवसेनेचे नगरसेवक राजू शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेनेच्या ३ नगरसेवकांच्या हालचालींवरुन शिवसेनेचेही नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याचे दिसत आहे.

प्रशांत पाटील, सुवर्णा पाटील आणि कमलताई पाटील अशी या ३ नगरसेवकांची नावे आहेत. हे तिघेही घणसोली विभागातील शिवसेना नगरसेवक आहेत. यांयनी घणसोली विभागात मोठी बॅनरबाजी केली आहे. पोस्टरवर गणेश नाईक, संजीव नाईक, संदिप नाईक यांचे फोटो लावले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या एकाही नेत्याचा फोटो नसल्याने हे तिन्ही नेते भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -'तुम्ही कृतघ्न आहात..! शरद पवार तर स्वत: बाप झालेत'

हेही वाचा -'एक खोका दे, नाहीतर ठार मारीन, व्यापाऱ्याला धमकावणारा कुख्यात गुंड गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details