ठाणे -शहरातील शिळडायघर येथील दहीसर नाका भागात चोरट्यांनी सुमारे 18 लाखांच्या रोकडसह एटीएम चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची चार पथके परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
चोरट्यांनी लाखो रुपयांच्या रकमेसह पळवले एटीएम - ठाणे चोरी बातमी
शिळ परिसरातील दहीसर ग्रामपंचायत क्षेत्रात अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. लॉकडाऊनमुळे रविवारी रात्री शुकशुकाट असल्याची संधी साधत सात ते आठ चोरट्यांनी हे एटीएमच चोरून नेले. या एटीएममध्ये 17 लाख 96 हजार 200 रूपये होते.
शिळ परिसरातील दहीसर ग्रामपंचायत क्षेत्रात अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर आहे. लॉकडाऊनमुळे रविवारी रात्री शुकशुकाट असल्याची संधी साधत सात ते आठ चोरट्यांनी हे एटीएम चोरून नेले. या एटीएममध्ये 17 लाख 96 हजार 200 रुपये होते. याप्रकरणी एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतका मोठा दरोडा पडूनही बँकेने साधी दखलही घेतलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, चोरट्यांनी दरोड्यासाठी वापरलेल्या चारचाकी वाहनाचा पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास शिळडायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.