महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane crime : खोदकाम करत बाजूच्या सोनाराच्या दुकानात घातला दिवसाढवळ्या दरोडा; रंगेहात सापडला चोर - S Kumar Gold and Diamonds Jewelery Shop

सोनाराच्या बाजूच्या दुकानात सुतार कामाचे कंत्राट ( Carpentry contract) मिळालेल्या कामगारांनी सोनाराच्या दुकानात कट रचत सुरंग करून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा अजब प्रकार ठाण्यात दिसून आला. ( Thief found red handed ) ठाण्यातील कोपरी विभागात भवानी ज्वेलर्स ( broad daylight robbery at goldsmiths shop) या दुकानावर भरदिवसा पडलेल्या दरोड्यात (Daylight robbery on side hill while digging ) एका चोराला रंगेहात पकडत सोनारानेच बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ( Thane crime )

Thief found red handed
खोदकाम करत बाजूच्या पेढीवर घातला दिवसाढवळ्या दरोडा

By

Published : Jan 10, 2023, 2:50 PM IST

खोदकाम करत बाजूच्या पेढीवर घातला दिवसाढवळ्या दरोडा

ठाणे :ठाण्यात कोपरी परिसरात असलेले भवानी ज्वेलर्स ही सोन्याची पेढी सोमवार असल्याने बंद होती. दुपारी दोनच्या सुमारास पेढीचे मालक काही कारणास्तव दुकानात आले असता त्यांना दुकानाच्या आतून आवाज ऐकू आला. घाबरत दुकानाचे शटर उघडताच त्यांना धक्का बसला. ( Daylight robbery on side hill while digging) कारण दुकानात चक्क एक चोर चोरी करण्याच्या इराद्याने घुसल्याचे आढळले. त्यांनी ताबडतोब चोराला पकडून बेदम चोप दिला व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ( broad daylight robbery at goldsmiths shop )

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद : सोनाराच्या पेढीच्या बाजूच्या दुकानातच सुतारकाम सुरू होते. त्याचाच फायदा घेत या कामगारांनी शकल लढवत एका कपाटातून भिंतीला भगदाड पाडून सोनाराच्या पेढीमध्ये प्रवेश केला होता. सदरची संपूर्ण चोरीची घटना सोनाराच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून दिवसाढवळ्या अशा प्रकारे झालेल्या चोरीच्या प्रकाराने सर्व दुकानदारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.


अचानक आल्याने चोरांची झाली पोलखोल :आज दुपारी अचानकपणे सोनार आपल्या दुकानांमध्ये आले आणि आल्यानंतर त्यांना या सर्व बाबींचा खुलासा झाला त्यांनी लागलीच शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपींना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले फर्निचरच्या कामासाठी चा आवाज निर्माण करून या दुकानात लुटण्याचा घाट घालण्यात आला होता. ही बाब पोलिसांना तपासात समोर आली आणि त्यांनी त्यानंतर पकडलेल्या आरोपीवर कारवाई केली.

बंदुकीचा धाक दाखवून मीरा रोडवरील सोन्याचे दुकान लुटले :मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर 4मध्ये असलेल्या एस कुमार गोल्ड अ‌ॅण्ड डायमंड्स ज्वेलरी शॉपमध्ये भरदिवसा दरोडा पडला आहे. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी दोनच्या सुमारास मोटार सायकलहून दरोडेखोर ग्राहक बनून आले होते व दुकानात दाखल झाले. बंदुकीच्या धाक दाखवून दरोडा टाकून पसार झाले. एका मोटारसायकलवर दोन आरोपी पसार झाले तर दोन दरोडेखोरांना काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून आपली मोटरसायकल जागेवर सोडून पायी धावत स्टेशनच्या दिशेने पसार झाले. घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

सोने घेण्याचे केले नाटक :मीरा भाईंदर वसई विरार परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले, की दुपारी दोनच्या सुमारास दोन मोटारसायकल वरून चार जण आले असे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. सोने घेण्याचे नाटक करत या चौघांनी ज्वेलरीच्या दुकानात प्रवेश केला. किती सोने गेले आहे त्याची संपूर्ण माहिती घेत आहोत. दोन जण मोटारसायकल वरून पळ काढण्यात यशस्वी झाले तर एक मोटारसायकल सुरू होत नाही, म्हणून चालत दोघे निघून गेले. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details