ठाणे - कल्याण पश्चिम येथे रौनक सिटीलगत असलेल्या फुटपाथजवळ दोन तोंड असलेले सापाचे पिल्लू आढळून आले. घोणस प्रजातीच्या सापाचे हे पिल्लू आहे.
कल्याण पश्चिम येथे दोन तोंड असलेले घोणस प्रजातीच्या सापाचे पिल्लू सापडले
स्थानिक प्राणीमित्र हरीष जाधव व संदिप पंडित यांनी दोन तोंड असलेल्या या छोट्या सापाला पकडले. त्यानंतर हे पिल्लू वॉर रेस्क्यू फॉऊंडेशनचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या ताब्यात देण्यात आले. कल्याणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे व वनपाल जाधव पदाधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मा रायबोले यांनी या सापाची प्राथमिक तपासणी केली आहे.
हेही वाचा - 'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच!
दोन तोंडे असलेला साप शारीरिकदृष्ट्या सुस्थितीत आहे. वॉर रेस्क्यू फॉऊंडेशन ही संस्था वन्यजीवांचा बचाव, पुनर्वसन, अभ्यास व जनजागृती या विषयावर काम करणारी संस्था आहे. दुर्मिळ दोन तोंड असलेल्या घोणस सापाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आमच्या ताब्यात हा साप दिला आहे. कल्याण वन विभागाच्या पुढील सूचना येईपर्यंत या सापाचा सांभाळ करणार, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली.