ठाणे- घाटात बंद पडलेल्या ट्रक वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अर्धा तासाच्या या थरारक नाट्यानंतर त्यातील एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांच्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले.
कसारा घाटात दरोडेखोरांचा थरार; झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी - कसारा घाटात ट्रकचालकाला मारहाण
ट्रक वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अर्धा तासाच्या या थरारक नाट्यानंतर त्यातील एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांच्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाले.
ट्रक चालकासह साथीदाराला बेदम मारहाण करून लुटले -नाशिक दिशेहून मुंबईकडे लोखंडी प्लेटा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच 40 बी जी 6165) हा १ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत होता. रात्रीच्यावेळी घाटात गाडीचा पाटा तुटला म्हणून, महामार्ग पोलिसाच्या मदतीने सदर ट्रक रस्त्याच्या कडेला लावण्यात आला. मात्र रात्रीच्या वेळी ट्रक चालकास महामार्ग पोलिसांनी गॅरेज उपलब्ध असलेल्या गॅरेजचा मोबाईल नंबर दिला आणि पोलीस गस्तीसाठी निघून गेले. यानंतर याचवेळी ट्रक जवळ एका दुचाकी वरून तीन तरुण आले. त्यांनी अंगावर पूर्ण काळे कपडे परिधान केले होते. या ३ तरुणांनी ट्रक चालकास आवाज देत उठवले आणि दादागिरी करायला सुरू केले. त्यानंतर त्यांनी ट्रकवर दगडफेक करताच, ट्रक चालकाने प्रसंगावधान ठेवत, महामार्ग पोलिसांना कॉल केला. तोपर्यंत या तरुण दरोडेखोरांनी ट्रकमध्ये चढून, ट्रक चालक विकी खोब्रागडे व क्लीनर निधी वासनिक ह्यांना बेदम मारहाण करायला सुरूवात केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतले.
फिल्मी स्टाईलने पाठलाग करून तिघेही लुटारू गजाआड - यादरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्रचे पोलीस कर्मचारी माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे व संजय नंदन हे तिथे घटनास्थळी पोहचले. पोलीस आल्याचे समजताच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जंगलात पळ काढला. या तिघा दरोडेखोरांमधील एका मुख्य सूत्रधाराला, विजय रामदास ढमाळे (रा.इगतपुरी) याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवल्याने, दरोडेखोर विजय ढमाळे याने पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले. कसारा पोलिसांनी आरोपींकडील दुचाकी जप्त करून या तिघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.