महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोपीला ठाणे कारागृह कर्मचाऱ्यांकडून मारहाण, कारागृह बदलीसाठी 10 लाखाची मागणी, न्यायाधिशांनी दिले चोकशीचे आदेश - ठाणे जिल्हा बातमी

कारागृहात आरोपीला औषधाची मागणी केल्यानंतर दिली नाही. यावरुन झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपीला मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर दुसऱ्या कारागृहात हलविण्यासाठी दहा लाखांची मागणी केली, असे आरोप ठाणे कारागृहातील आरोपीने न्यायालयात केले आहे. याची दखल घेत न्यायालयाने संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

आरोपी
आरोपी

By

Published : Aug 23, 2021, 10:23 PM IST

ठाणे -ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या आरोपीला औषधाची मागणी केल्यानंतर दिली नाही. यावरुन झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपी मनिंदर सुखविंदरसिंग उर्फ जोरावर सिंग उर्फ मिळू बलकार सिंग याला ठाणे कारागृह अधीक्षक अहीरराव यांच्या सांगण्यावरून कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पट्ट्याने मारहाण केली. याबाबत न्यायालयात सांगितल्यास परिणाम वाईट होतील, अशी दमबाजीही केल्याचा आरोप जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश - 1 पनवेल यांच्या न्यायालयात आरोपीने केला आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

दहा लाखाची मगाणी करुन न्यायालयात तक्रार केल्या वाईट परिणाम होतील, असे आरोपीने केले आरोप

आरोपी मनिंदर सुखविंदरसिंग उर्फ जोरावर सिंग उर्फ मिळू बलकार सिंग याला 5 ऑगस्ट, 2011 रोजी त्यास जे जे रुग्णालय, मुंबई येथे नेण्यात आले व तेथे सांगितल्यावरुन त्यांनी काही पेन किलर व काही औषधे दिली होती. कारागृहातील पोलीस अधिकारी पठाण व कानसकरांनी त्यांच्याकडे त्या कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलविण्यासाठी 10 लाखांची मागणी केली व पैशाची व्यवस्था झाली आहे का याची विचारणा केली. ठाणे कारागृह अधीक्षक अहिरराव यांनी आरोपीला 7 ते 12 ऑगस्ट या कालावधीत अंडासेलमध्ये ठेवले बाहेर काढलेच नाही. कारागृह अधिकारी पठाण यांनी 12 ऑगस्टला कोऱ्या कागदावर आरोपीच्या सह्या घेतल्या. त्यानंतर अंडा सेलमधून बाहेर काढले आणि बहिणीशीही बोलू दिले. मात्र, सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यासाठी बाहेर काढत असताना पोलीस अधिकारी पठाण व कानसकर यांनी न्यायालयात त्याच्या विरुद्ध काही तक्रार केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिल्याचे न्यायालयात आरोपीने सांगितले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी अन् तक्रार घ्यावी - न्यायालय

आरोपी मनिंदर सुखविंदरसिंग बाजना उर्फ जोरावर सिंग उर्फ मिळू बलकार सिंग याने न्यायालयात केलेल्या कथनावर जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 पनवेल यांनी दिलेल्या आदेशात आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी आणि त्याचा आवाहल 2 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावा. लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नवी मुंबईनो केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने कारागृहात जाऊन आरोपीची भेट घ्यावी, तक्रार घ्यावी व योग्य तो तपास करावा. आरोपीच्या वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला तळोजा कारागृहात स्थलांतर करावे, असे आदेश दिले.

हेही वाचा -आज वडापाव दिन... मुंबईत १९६० ला झाला जन्म, अशोक वैद्य यांची शक्कल ठरली मुंबईची ओळख

ABOUT THE AUTHOR

...view details