महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या काळात 'या' लंगरचा गरिबांना आधार; १५ हजारांहून अधिक लोकांच्या जेवणाची व्यवस्था - corona updates

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. ठाण्याच्या उल्हासनगरातील अशाच गरजवंतांसाठी थायरसिंग दरबारच्या वतीने लंगरच्या माध्यमातून दिवसरात्र जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 'या' लंगरचा गरिबांना मिळाला आधार
लॉकडाऊनच्या काळात 'या' लंगरचा गरिबांना मिळाला आधार

By

Published : Apr 7, 2020, 9:19 AM IST

Updated : Apr 7, 2020, 11:21 AM IST

ठाणे - कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसह हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे दोन वेळच्या अन्नासाठी हाल होताना दिसत आहे. अशाच लोकांसाठी उल्हासनगरातील थायरसिंग दरबारमध्ये २४ तास लंगर सुरू केला आहे. या लंगरमधून दिवसागणिक १५ हजारांहून अधिक गरजू नागरिकांची २ वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे दरबारच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या काळात 'या' लंगरचा गरिबांना आधार

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक घराबाहेर विनाकारण पडत असल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषीत केले. तेव्हापासून सर्वसामान्यांसह हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल होताना दिसत आहे. त्यातच जिल्ह्यातून आजही शेकडो मजुरांचे स्थलांतर सुरू आहे. तर, आजही उल्हासनगर शहरात हजारो मजूर-कामगारवर्ग लॉकडाऊनची बंदी उठण्याची वाट पाहत आहेत. लॉक डाऊनच्या परिस्थितीत त्यांना दोन वेळेचे अन्नही मिळत नसल्याचे थायरसिंग दरबारच्या पदाधिकाऱ्यांना दिसून आले. यामुळे, त्यांनी हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था दिवसरात्र सुरू केली आहे. विशेष म्हणजे अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षातील पुढारी, कार्यकर्ते आपआपल्या परिसरातील गोरगरिबांना याच लंगरमधून दोन वेळेचे जेवण पुरवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Last Updated : Apr 7, 2020, 11:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details