महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या; संपत्तीच्या वादातून सावत्र भावाचे कृत्य - thane crime news

राकेश पाटील हत्याप्रकरणी पोलिसांनी माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह याला अटक केली असून सावत्र भाऊ सचिन पाटील अद्यापही फरार आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

rakesh patil murder case
ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या; संपत्तीच्या वादात सावत्र भावाचे कृत्य

By

Published : Sep 25, 2020, 11:19 AM IST

ठाणे-शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेश पाटील (34) याची हत्या करून मृतदेह वाशी खाडीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. राकेशचा खून संपत्तीच्या वादात त्याचा सावत्र भाऊ सचिन पाटील आणि माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह (27) यांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी गौरवला अटक केली असून सचिन फरार आहे.

ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या; संपत्तीच्या वादात सावत्र भावाचे कृत्य

घोडबंदर रोड येथील वाघबीळ भागात राहणारे माणिक पाटील हे ठाणे महापालिकेचे वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील शिवसेनेचे नगरसेवक आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या पत्नीसह उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल होते. 20 सप्टेंबरला उपचार करून घरी आल्यानंतर त्यांना घरातील तिजोरी फोडल्याचे आढळले. तसेच त्यांचा मुलगा राकेश हा देखील आढळून आला नव्हता. याप्रकरणी माणिक पाटील यांनी राकेश बेपत्ता असल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असताना राकेश याचा खून झाला असून तो माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह याने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून आझादनगर येथून गौरवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. संपत्तीसाठी सचिनने राकेशच्या हत्येचा कट रचला होता. 20 सप्टेंबरला सचिनने राकेशवर गोळी झाडून हत्या केल्याचे गौरवने सांगितले. तसेच हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आम्ही राकेशचा मृतदेह वाशी खाडीत फेकून दिल्याची कबुली गौरवने दिल्याचे सुत्रांनी सांगितले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details