ठाणे - लहानपणापासून आतापर्यंत आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मला गुरू भेटत गेले. शालेय, महाविद्यालयीन आणि नोकरी व्यवसायात आतापर्यंत जे गुरू लाभले त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांची माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका आहे, असे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले. तसेच त्यांनी त्यांच्या गुरुंना गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन केले.
तस्मै श्री गुरवे नमः : 'शालेय, महाविद्यालयीन अन् नोकरी व्यवसायातील गुरूंचे अनन्यसाधारण महत्व'
आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी 'तस्मै श्री गुरवे नमः' ही सिरीज घेऊन आलो आहोत. त्याद्वारे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गुरूबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुपौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व असते. जीवन जगत असताना आपण प्रत्येकाकडून काहीतरी शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही प्रमाणात आपला गुरू असतो. गुरू हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असतो, असेही फणसाळकर म्हणाले. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंना वंदन करण्याबरोबरच आपल्या शिष्यांना शुभाशीर्वाद द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच यानिमित्त कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.