महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला अटक

अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तीघांना नवी मुंबई कळवा रस्त्यावर सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ लाख ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला अटक

By

Published : Jun 11, 2019, 11:52 PM IST

ठाणे - अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तीघांना नवी मुंबई कळवा रस्त्यावर सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ लाख ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या त्रिकुटाला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला अटक

तीन तस्कर ४ किलोग्रॅम चरस ठाण्यात विक्रीसाठी आणनार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकाला मिळाली होती. पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना ८ जून रोजी याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने व ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने ऐरोली कळवा रोडवरील एसटी वर्कशॉप येथे सापळा लावला.

यावेळी समीर आलम महंमद स्माईल शेख (वय-२२, रा. जुहूगाव, वाशी, नवी मुंबई) आणि व्यंकट श्रीमंत काळे (२२, महापे गाव, नवी मुंबई) अशा दोघा संशयीत दुचाकीस्वार तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या जवळील ज्युपिटर या दुचाकीत प्रत्येकी दोन असे एकूण चार किलो चरस आढळून आले.

अटकेतल्या दोघा तरुणांच्या चौकशीतून हे अमली पदार्थ नवी मुंबई येथील खैरणेगाव येथे राहणाऱ्या अस्लम रियाजुद्दीन अन्सारी (३४) याने पुरवल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यास देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रथम अटक केलेल्या दोघा आरोपींकडून ८ लाख ५३ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात चरस, दुचाकी आणि मोबाईलचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details