ठाणे - तुला चेटकीणीने झपाटले आहे, तुझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत. तुझ्या घरच्यांचा तुला त्रास असल्याचे सांगत महिलांचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबासह त्याला मदत करणाऱ्या महिलेला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चंद्रेश नरसी पीर (वय 49 रा. डोंबिवली) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याला या कृत्यात मदत करणाऱ्या महिलेचं नाव भारती शेवाळे असून ती याच परिसरातील रहिवासी आहे.
नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत स्त्रियांचा विनयभंग, भोंदूबाबासह मदतनीस महिलेला बेड्या
कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदूबाबाचा गोरखधंदा सुरू होता. या परिसरात राहणारी एक महिला चुलत बहिणी सोबत पतपेढीच्या कामासंदर्भात याठिकाणी गेली होती. त्यावेळी या भोंदूबाबाने तुझ्यावर चुडेल आहे. मी ती काढून देतो. तुझ्या नवऱ्याचे बाहेरील स्त्रीशी विवाहबाह्य संबंध आहेत. तुझ्या घरच्यांच्या तुला त्रास आहे, असे सांगून तिला भीती दाखवली.
कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदूबाबाचा गोरखधंदा सुरू होता. या परिसरात राहणारी एक महिला चुलत बहिणी सोबत पतपेढीच्या कामासंदर्भात याठिकाणी गेली होती. त्यावेळी या भोंदूबाबाने तुझ्यावर चुडेल आहे. मी ती काढून देतो. तुझ्या नवऱ्याचे बाहेरील स्त्रीशी विवाह बाह्य संबंध आहेत. तुझ्या घरच्यांचा तुला त्रास आहे, असे सांगून तिला भीती दाखवली. त्यानंतर त्या पीडित महिलेच्या चेहऱ्यावर सिगरेटचा धूर सोडला आणि पीडित महिलेला सेंट लावण्याच्या बहाण्याने शरीरावर हात फिरवला. यानंतर या महिलेकडे पूजेसाठी पंचवीस हजार रुपये मागत याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र-तंत्राने तुमचे नुकसान करू अशी धमकी दिली. मात्र, त्याला न जुमानता पीडित महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन या भोंदूबाबाचे बिंग फोडले.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी भोंदू बाबाच्या घरी छापा मारला. या ठिकाणावरुन पूजेचे साहित्य, टाचण्या, दिवे, हळद कुंकू आधी साहित्य आढळून आले. काही नागरिक ही आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन या बाबाकडे आल्याचे दिसले. दरम्यान खडकपाडा पोलिसांनी या भोंदू बाबाला आणि त्याच्या कृत्यात मदत करणाऱ्या भारती या महिलेला ताब्यात घेतले. भोंदू बाबावर विनयभंगा सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. भोंदूबाबाला सहकार्य करणाऱ्या भारती शेवाळे ही इतर गरजू महिलांना या भोंदूबाबासाठी जाळ्यात ओढण्याचे काम करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.