महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात शुक्रवारी बारा तास पाणीपुरवठा बंद! - water supply off

महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या व स्टेम प्राधिकरण यांच्या मुख्‍य जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी शुक्रवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेतर्फे  शुक्रवारी दिनांक २० सप्टेंबरला सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका

By

Published : Sep 17, 2019, 11:17 PM IST

ठाणे -महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या व स्टेम प्राधिकरण यांच्या मुख्‍य जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी शुक्रवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवार दिनांक २० सप्टेंबरला सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - वाहन उद्योगात मंदी नाही; व्यापारी संघटना सीएआयटीचा दावा

देखभाल व दुरूस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्‍याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे उपनगरअभियंता यांनी केले आहे.

हेही वाचा - धारावी मतदारसंघ काँग्रेसच्या वर्षा गायकवाड राखणार का?

ABOUT THE AUTHOR

...view details