महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात राज ठाकरे यांचा मुखवटा लावून मनसैनिकांची रॅली - election

महाराष्ट्र सैनिकांनी राज ठाकरे यांचे मुखवटे परिधान करत वातावरणनिर्मिती करताना दिसून आले.

राज ठाकरेला समर्थन

By

Published : Apr 28, 2019, 11:29 AM IST

ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी ठाणे मनसेच्यावतीने राज ठाकरे यांचे मुखवटे परिधान करत समर्थन रॅली काढण्यात आली.

राज ठाकरेला समर्थन

महाराष्ट्र सैनिकांनी राज ठाकरे यांचे मुखवटे परिधान करत वातावरणनिर्मिती करताना दिसून आले. मनसेचे विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्या संकल्पनेतून आज राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत असून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी आम्ही त्यांच्या बरोबर असणार आहे.
यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी होय मी फक्त राजभक्त या आशयाचे टी शर्ट घालून राज ठाकरे यांचे मुखवटे परिधान केले होते. ठाण्यातील मनसे कार्यालयात जाताना मनसे कार्यकर्त्यांनी आशा अनोख्या पद्धतीने अनोख्या पद्धतीने समर्थन दाखवले.

ABOUT THE AUTHOR

...view details