ठाणे -शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे आता पालिका प्रशासन संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावरून उतरून बिनामास्क आणि सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करत आहे. ( Thane Administration Taking Action ) कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर पूर्ण बाधितांची संख्या कमी होऊ लागली होती. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मुंबई ठाण्यातसह संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. ( Omicron Situation in Thane )
मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या 24 तासात ठाणे महापालिका हद्दीत दोन हजारहून अधिक रुग्ण सापडल्याने प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासन आणि ठाणे नगर पोलिसांकडून आज (शुक्रवारी) ठाण्यातील मध्यवर्ती असलेल्या घाऊक बाजारात विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे.
हेही वाचा -Omicron Positive Family gone Tour : केनियाहून आलेले ओमायक्रॉन पॉझिटिव्ह कुटूंब सहलीला; गुन्हा दाखल