महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेयसीला कारखाली चिरडलं; नवीन ट्विस्ट आला समोर, पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीवरून 'पायलट' लोगोच गायब - पायलट लोगो गायब

Lover Try To Kill Girlfriend : प्रियकरानं आपल्या प्रेयसीला किरकोळ वादातून कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. त्या रात्री पीडित तरुणीला ज्या गाडीतून रुग्णालयात आणण्यात आलं, ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. मात्र, आता नवीन ट्विस्ट या प्रकरणामध्ये समोर आला आहे.

Lover Try To Kill Girlfriend
Lover Try To Kill Girlfriend

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 9:37 PM IST

Updated : Dec 16, 2023, 9:56 PM IST

पाहा व्हिडिओ

ठाणे Lover Try To Kill Girlfriend : प्रेयसीला गाडीखाली चिरडल्याच्या आरोपानंतर, कासारवडवली पोलिसांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजीत गायकवाड याच्यासह त्याच्या साथीदारांना हजर राहण्याची नोटिस बजावली आहे. अश्वजीतनं 11 डिसेंबर रोजी आपल्या प्रेयसीला ठाण्यातील घोडबंदर परिसरात कारखाली चिरडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. मात्र, आता अश्वजीतच्या दोन वेगवेगळ्या गाड्यांमुळं नवीन ट्विस्ट समोर आलाय.

आरोपींना अद्याप अटक नाही : पीडित तरुणीनं तिचा प्रियकर अश्वजीत गायकवाड याच्यावर आपल्या साथीदारांसह मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडून पाच दिवस झाले, मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी जी कलमं लावली, ती जामीन पात्र असल्याचा दावा पीडित तरुणीनं केलाय. त्यामुळे आता अश्वजीत गायकवाड आणि त्याच्या साथीदारांना कोण वाचवतंय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

गाडीवरील 'पायलट' लोगो गायब : त्या रात्री पीडित तरुणीला ज्या स्कॉर्पिओ गाडीतून रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. या फुटेजमध्ये स्कॉर्पिओ गाडीवर 'पायलट' लोगो दिसतोय. मात्र पोलिसांनी जेव्हा ही स्कॉर्पिओ गाडी जप्त केली, तेव्हा त्या गाडीवर 'पायलट' लोग दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडी जप्त केल्यानंतर त्यावरील 'पायलट' लोगो काढण्यात आला का? असं बोललं जातंय. मात्र, हा लोगो का काढण्यात आला? याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण उपलब्ध असलेल्या दोन वेगवेगळ्या व्हिडिओमधून कारवर 'पायलट'हे नाव हटवल्याचं दिसून येत आहे.

ज्या गाडीखाली चिरडलं, ती गाडी ताब्यात घेतलेली नाही : या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, ज्या गाडीखाली तरुणीला चिरडण्यात आलं, ती आलिशान गाडी अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेलीच नसल्याची माहिती आहे. मारहाण आणि गाडीखाली चिरडल्यानंतर अश्वजीतनं गाडी बदलली, असा दावा पीडित तरुणीनं केला. या प्रकरणात आरोपी असलेला अश्वजित गायकवाड याचा लकी नंबर '३' आहे. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या सर्व वाहनांचा क्रमांक देखील '३' च आहे. याशिवाय अश्वजीत गायकवाड हा आपल्या खासगी आयुष्यातील मौजमजेसाठी लाल दिव्याची गाडी वापरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आरोपी बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्यानं त्याची ठाणे शहरात ओळख असून, तो अंमली पदार्थांचं सेवन देखील करतो, असा आरोप पीडित तरुणीनं केलाय. दरम्यान, कारवरील 'पायलट' हे नाव कोणी व का हटवले? ज्या कारने चिरडलं ती कार कुठे आहे? याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया पोलिसांकडून मिळालेली नाही. मात्र, समोर आलेले फोटो आणि व्हिडिओमधून हे सर्व स्पष्ट दिसून येतंय.

हे वाचलंत का :

  1. अधिकाऱ्याच्या पोराचा प्रताप; किरकोळ वादातून प्रेयसीला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न, पीडिता गंभीर
Last Updated : Dec 16, 2023, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details