महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपरीकरांनी विकासाला मतदान करावे - आनंद परांजपे - ncp loksabha

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोपरीत संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली.

आनंद परांजपे नागरिकांच्या भेटी घेताना

By

Published : Apr 12, 2019, 2:36 PM IST

ठाणे- शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोपरीत संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. यावेळी कोपरीतील नागरिकांनी आनंद परांजपे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोपरीकरांनी विकासाला मतदान करावे, असे आवाहन आनंद परांजपे यांनी मतदारांना केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी ठाण्यातील कडवा गल्लीतील पुतळ्याला अभिवादन करून महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी कोपरी येथील चेंदनी कोळीवाडा, अष्टविनायक चौक, मंगला हायस्कूल, प्रेम नगर, गावदेवी भाजी मार्केट, सिधी कॅम्प, बारा बांगला, आनंद नगर या ठिकाणी जाऊन प्रचार केला. दरम्यान कोपरी येथे घरोघरी जाऊन नागरिकांचे आशीर्वाद परांजपे यांनी घेतले.

आनंद परांजपे यांची प्रचार यात्रा

कोपरीतील मित्र पक्षाच्या कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेतल्या. आमदार जितेंद्र आव्हाडही प्रचारास उपस्थितीत होते. यावेळी ५ वर्षात रखडलेल्या विकासाबाबत मतदारांना सांगण्यात आले. महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या कोपरी येथील क्लस्टर योजनेबाबत नागरिकांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. सत्ताधारी पक्षाने क्लस्टरचे गाजर दाखवले असून भावनिक मुद्यावर शिवसेना राजकारण करीत असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. मतदारांनी डोळे उघडून आनंद परांजपे यांना एक संधी द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details