महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींची मदत - CM Fund

महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी हा धनादेश सुपूर्द केला.

help
एक कोटींची मदत

By

Published : May 6, 2020, 11:52 AM IST

Updated : May 6, 2020, 12:56 PM IST

ठाणे - कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी हा धनादेश सुपूर्द केला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींची मदत

महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यशासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला बँकेने प्रतिसाद दिला आहे. यावेळी आमदार राजेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे हे उपस्थित होते.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिडेटचे संचालक, अधिकारी-कर्मचारी, सभासद यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.

Last Updated : May 6, 2020, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details