महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात धनगर आरक्षणासाठी 'ढोल बजाव, सरकार भगाओ' आंदोलन - ढोल बजाव सरकार भगाओ आंदोलन

ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ढोल बडवत राज्य सरकारचा धनगर समाजाने निषेध केला. 'ढोल बजाव, सरकार भगाओ', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे' म्हणत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

thane-dhangar-andolan-by-bjp
ठाण्यात धनगर आरक्षणासाठी 'ढोल बजाव, सरकार भगाओ' आंदोलन

By

Published : Sep 25, 2020, 3:52 PM IST

ठाणे -एकीकडे मराठा आरक्षणावरून वाद पेटला असताना दुसरीकडे, इतर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मराठा समाजानंतर आता येळकोट येळकोट म्हणत धनगर समाजही रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. यावेळी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ढोल बडवत राज्य सरकारचा धनगर समाजाने निषेध केला.

ठाण्यात धनगर आरक्षणासाठी 'ढोल बजाव, सरकार भगाओ' आंदोलन

यावेळी 'ढोल बजाव, सरकार भगाओ', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे' म्हणत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मागील सरकारने 1000 हजार कोटी रुपये बजेटमध्ये दिले होते. तसेच या महाघाडी सरकारने ती तरतूद केली नसल्यामुळे धनगर समाज निराश झाला आहे, असे भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सांगितले. या आंदोलनात भाजपा आमदार संजय केळकर, निरंजन डावखरेसह धनगर समाजाचे नेते देखील उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details