ठाणे -दिवा, दातिवलीतील ठाणे महापालिका शाळा क्र. ९४ मधील बालवाडी ही दुरुस्तीच्या नावाखाली शाळा मंदिरात भरत होती. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने जुन्या बालवाडीच्या दुरूस्तीचे काम थांबवून आता नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनविसेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
दातिवली बालवाडीची नवीन इमारत बांधण्याचा महापालिकेचा निर्णय, मनसेच्या आंदोलनाला यश - agitation
या आंदोलनाची दखल घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने जुन्या बालवाडीच्या दुरूस्तीचे काम थांबवून आता नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनविसेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र ९४ मधील बालवाडी क्र २२ चा वर्ग हा दुरुस्तीच्या नावाखाली मंदिरात भरवण्यात येत होता. यामुळे ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली १३ फेब्रुवारीला शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर टाळ-मृदुंग वाजवून भजन आंदोलन केले होते. दुरुस्ती करून वर्ग लवकरात लवकर योग्य जागी भरावा, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीची गंभीर दाखल घेत धोकादायक बालवाडी तोडून तेथे नवीन बालवाडी इमारत बांधण्यात येईल, असे लेखी आश्वासन महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनी अरुण घोसाळकर यांना दिले. यावेळी हे आंदोलन यशस्वी झाल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.