ठाणे - क्षयरोग (टीबी) वेळीच औषधे मिळाले नाहीत जीवघेणाही ठरू शकतो. या रोगाची औषधे स्थानिक पातळीवरच खरेदी करावीत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या असतानाही ठाणे महापालिकेने निधी अभावी ही औषधे खरेदी केलेली नाहीत. परिणामी रुग्णांचे हाल होत आहेत. यामुळे ही औषधे लवकरात लवकर उपलब्ध करावीत, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी शुक्रवारी रुग्णांना घेऊन थेट महासभाच गाठली.
ठाण्यातील रुग्णालयात टीबीची औषधे नसल्याने रुग्ण धडकले महासभेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली टीबीचे रुग्ण सभागृहात जाऊन धडकले आणि त्यांनी आयुक्तांकडे औषधे पुरविण्याची मागणी केली. आयुक्तांनी येत्या दोन दिवसांत औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
ठाण्यातील रुग्णालयात टीबीची औषधी नसल्याने रुग्ण धडकले महासभेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्ण सभागृहात जाऊन धडकले आणि त्यांनी आयुक्तांकडे औषधे पुरविण्याची मागणी केली. आयुक्तांनी येत्या दोन दिवसांत औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.