ठाणे - डोंबिवलीतील चार रस्त्यावर घराला लागलेली ईडापिडा दूर करण्याच्या उद्देशाने अंधश्रद्धेपोटी एका अज्ञात व्यक्तीने काळ्याजादूचे साहित्य ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांसह रस्त्यावरून जाणारे प्रवाशांमध्येदेखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंबिवलीतील चार रस्त्यावर काळ्या जादूचे साहित्य; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - ठाणे
डोंबिवलीतील अंधेश्रद्धेच्यापोटी चौरस्त्यावर काळ्या जादूचे साहित ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण परिसरातील गाव पाड्यातील वस्तीत आजही अंधश्रद्धा ठासून भरल्याचे दिसून येत आहे. त्याच अंधश्रद्धेतून निवासी विभागातील सर्व्हिस रोडवरील एका चौकात बांबूच्या टोपलीत काळ्या कापडाची खिळे ठोकलेली बाहुली, टाचणी टोचलेले लिंबू, कोहळा, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, नारळ आदी काळीजादूच्या साहित्य रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेले आहे. समोरून कल्याण-शिळ महामार्ग, पाईपलाईन रस्ता, निवासी विभागातील रस्ता, असे चौफेर रस्ते मिळतात. त्यामुळे हा प्रकार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रस्ता ओलांडताना प्रत्येक जण काळजीने प्रवास करीत आहेत.