महाराष्ट्र

maharashtra

Sujat Ambedkar On Ketki Chitale Post : केतकी चितळेची शरद पवरांवरील पोस्ट अशोभनीय; सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

By

Published : May 16, 2022, 3:54 PM IST

शरद पवार यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitale Post On Sharad Pawar ) हिने केलेलं ट्विट अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर ( Sujat Ambedkar Reaction On Ketki Chitale Post ) यांनी दिली आहे.

Sujat Ambedkar On Ketki Chitale Post
Sujat Ambedkar On Ketki Chitale Post

ठाणे -शरद पवार यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitale Post On Sharad Pawar ) हिने केलेलं ट्विट अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर ( Sujat Ambedkar On Ketki Chitale Post ) यांनी दिली आहे. ते मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमासाठी कल्याणात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले.

प्रतिक्रिया

जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार प्रेरणादायी -सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता असल्याचे मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांच्या मेंटल हेल्थलाही त्रास होऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा. मात्र कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही, असं सुजात आंबेडकर म्हणाले. शरद पवार यांना महाराष्ट्रभर आदर असून त्यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अशोभनीय होते. जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे प्रेरणा आहेत. कारण कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटत, भाषणं करतात, त्यामुळं त्या नेत्याबद्दल असं बोलणं चुकीचं असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले.

समाजाच्या प्रश्नांकडे माध्यमांचं दुर्लक्ष -सुजात आंबेडकरांनी यावेळी राजकारण्यांच्या भांडणात समाजाच्या प्रश्नांकडे माध्यमांचं दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं. मीडियाचा नॅरेटिव्ह योग्य हवा. दोन पक्षांच्या भांडणात समाजाकडे दुर्लक्ष होत असून समाजाचे प्रश्न मांडणं महत्त्वाचं आहे. सुशांत सिंग, कंगना राणावत प्रकरणात कोरोना, रेमडेसिविर या प्रश्नांकडे मीडियाचं दुर्लक्ष झाल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले. आपल्याकडे अंबानी अदानी इतका पैसा नसून त्यासाठीच प्रबुद्ध भारतसारखं माध्यम आपल्या हातात हवं. हीच गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी देखील सांगितली होती. त्यामुळं समाजासाठी मीडियाचा नॅरेटिव्ह तितकाच महत्त्वाचा असल्याचं सुजात आंबेडकर म्हणाले.

वंचितांचे राजकारण बाजूला ठेवल जाते -ए आणि बी म्हणजेच काँग्रेसने आणि भाजपा थोडक्यात यांच्या नरेटिव्हमध्ये अडकून वंचितांचे राजकारण बाजूला ठेवल जाते. हे आम्ही जे अनुभवलं आहे. त्यामुळे प्रबुद्ध भारत पाक्षिक स्वरूपात प्रबुद्ध भारत वेबसाईट, मग प्रबुद्ध भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि मग प्रबुद्ध भारतचे पुस्तक प्रकाशन हे मोठ्या प्रमाणात करत आहोत. हे आम्हाला अनुभवातून शिकायला मिळाला आणि या अनुभवानंतर जाणवलं की हे करणं किती महत्त्वाचं होतं, असही सुजात आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा -PM Modi in Lumbini : पंतप्रधान गौतम बुद्धांचे जन्मगाव असलेल्या लुंबिनीत दाखल, महामाया देवी मंदिराला दिली भेट

ABOUT THE AUTHOR

...view details