विद्यार्थ्यांचा उपद्रव सीसीटीव्हीत कैद
ठाणे: उल्हासनगर शहरातील 24 सेक्शन परिसरात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कार, रिक्षा, टेंपोसह दुचाकी अशा 14 ते 15 वाहनांची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वाहनांची तोडफोड करणाऱ्याचा शोध घेतला असता, हा प्रकार शाळेत झालेल्या भांडणाचा राग म्हणून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले.
रागाच्या भरात वाहनांची तोडफोड : उल्हासनगर शहरातील पंजाबी कॉलनी परिसरातील एका शाळेत १२ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची किरकोळ कारणावरून आपापसामध्ये भांडण झाली होती. मात्र या भांडणाचा राग एका विद्यार्थ्याच्या मनात होता. त्यातच १५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या इतर मित्रांना बोलवून या तिन्ही अल्पवयीन विधार्थी एकत्र येत हातातील लोखंडी रॉडच्या सहाय्याने रस्त्याच्याकडे असलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. दरम्यान या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला, यात मात्र विद्यार्थ्यांनी ही गाड्यांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. हे सगळे विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून एकाला १६ जानेवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
विद्यार्थ्यांनी भांडणावरून काढला राग : उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 3 मधिल एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे भांडण झाले होते. याच रागातून दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या दोन मित्रांसोबत हातात लोखंडी रॉड घेऊन पहाटेच्या सुमारास सेक्शन २४ च्या खत्री भवन ते अशोक अनिल थिएटर जवळील रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या कार, दुचाकी, टेम्पो आणि रिक्षा अशा १४ वाहनांची तोडफोड केली.
घटना सीसीटीव्हीत कैद : तोडफोड करतानाची घटना सीसीटीव्हीत मध्ये कैद झाली होती. ही माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात,पोलीस हवालदार राजाराम कुकले, विलास जरग, पोलीस नाईक सतिश सोनावणे, महेश बगाड, प्रदीप खरमाळे यांच्या पथकाने तपास सुरु केला असता एका शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यानुसार तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले असून नोटीस बजावून त्यांना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.
हेही वाचा : CM Shinde Cutout Outside Matoshree : मातोश्रीच्या बाहेर मुख्यमंत्र्यांचे मोठे कटआउट; पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी