ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील पिपलास फाट्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महामार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे काम सुरू होते. हे पाहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अनेक वाहनचालकांनी आपली वाहने धीम्या गतीने चालवत होते. परंतु सोमवारी पहाटेच्या साडे तीन वाजल्याच्या सुमारास याच मार्गावर मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने पाच ते सहा चारचाकी वाहनांना जोरदार धडक देऊन पसार झाला आहे. या भीषण अपघातात एका ओला कारमधील दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले.जखमीना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जीवित हानी झाली नाही : घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर महामार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे कामगारही या अपघात जखमी झाले असून त्यांचे झेब्रा क्रॉसिंग पट्टा मारणाऱ्या मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये आतापर्यत जीवित हानी झाली नाही. अपघात गंभीर जखमींची नावे समजू शकली नाही. या भीषण अपघाताच्या संपूर्ण घटनेची चौकशी पोलीस पथक करत आहेत. तर महार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार ट्रक चालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
दुचाकीवरील एकाचा मृत्यू : या आधीही अहमदनगरयेथे 18 जानेवारी रोजी अशीच एक घटना घडली होती. अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर लोखंडी सावरगावजवळ भरधाव वेगातील एसटी बसने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला होता. तर दोघांची प्रकृती चिंताजनक होती. हा अपघात दुचाकी व बस यांच्यात समोरासमोर झाला. संजय अंकुश डहाणे (वय 50, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव होते.