ठाणे -राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी दिली असून त्यासाठी दोन लस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवास करता येणार आहे. त्या आधारे सामान्य नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. यासाठी प्रवाशांची कागदपत्रे तपासून त्यांना क्यूआर कोड उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.
क्यूआर कोडनंतरच तिकीट किंवा मासिक मिळणार
क्यूआर कोड मिळविण्यासाठी प्रवाशांना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व आधारकार्डचे झेरॉक्स लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच प्रवाशांना क्यूआरे कोड दिला जाईल. त्यानंतर प्रवासी तिकीट किंवा मासिक पास काढू शकणार आहेत.