ठाणे : कौटुंबिक वादातून जन्मदात्या ६० वर्षीय बापाची डोक्यात लाकडी फळीची उपट घालून (hitting on father head with wooden board) ३१ वर्षीय मुलाने बापाला जागीच ठार (son killed father in Thane) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची (domestic violence) ही घटना अंबरनाथ पूर्वेतील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (Murder Case filed against Son) करून आरोपीला मुलाला बेड्या ठोकल्या (Son arrested for killing father) आहे. प्रकाश देविदास सूर्यवंशी असे अटक आरोपी मुलाचे नाव आहे. तर देविदास किसन सूर्यवंशी असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे. latest news from Thane, Thane Crime
Domestic Violence : बापाच्या डोक्यात लाकडी फळीची उपट घालून जागीच ठार मारणाऱ्या मुलाला बेड्या
बापाची डोक्यात लाकडी फळीची उपट घालून (hitting on father head with wooden board) ३१ वर्षीय मुलाने बापाला जागीच ठार (son killed father in Thane) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची (domestic violence) ही घटना अंबरनाथ पूर्वेतील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (Murder Case filed against Son) करून आरोपीला मुलाला बेड्या ठोकल्या (Son arrested for killing father) आहे.
रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत :मृत देविदास हे पत्नी आणि आरोपी मुलगा प्रकाश यांच्यासह अंबरनाथ पूर्वेकडील दत्त कुटीर चाळीत राहत होते. गेल्या काही दिवसापासून बाप लेकात घरगुती कारणावरून कौटुंबिक वाद होत होते. बाप लेकाचा पुन्हा याच वादातून १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान घरातच वाद झाला. हा वाद यावेळी विकोपाला जात मुलाने घरात असलेल्या लाकडी जाडफळी उचून बापाच्या डोक्यात जोरदार उपट घातली. या फळी हल्ल्यात बाप जागीच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत झाला.
आरोपी मुलगा पोलीस कोठडीत :दरम्यान, घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्यात समजताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत देविदास यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर मृतकच्या पत्नीने मुलाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी मुलावर भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे. आज दुपारच्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे करीत आहेत.