महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 'हे' विभाग अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद

ठाण्यातील काही परिसर अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

corona virus
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 'हे' विभाग अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद

By

Published : May 12, 2020, 1:14 PM IST

ठाणे - शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांचा वाढता आकडा बघता शहरातील काही भाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमान्य- सावरकरनगर प्रभागसमिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6,13,14 व 15 (लोकमान्यनगर, सावरकनगर, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर, काजूवाडी विभाग) मध्ये कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू असूनदेखील नागरिक दुकाने तसेच भाजी मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी करत आहेत. रस्त्यावरील वर्दळदेखील वाढतच आहे. नागरिकांमार्फत सोशल डिस्टन्सींगचे पालन होत नाही. लॉकडाऊन (संचारबंदी) करुनही काही सुधारणा दिसून येत नसल्यामुळे मंगळवार मध्यरात्रीपासून हे विभाग अनिश्चीत कालावधीसाठी पूर्णत: बंद करण्यात येत आहे.


लोकमान्य सावरकरप्रभाग समिती कार्यक्षेत्रात मागील 4 ते 5 दिवसात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. संचारबंदी लागू असून देखील नागरिक विविध कारणासाठी गर्दी करीत असल्याने कोरोनाचा फैलाव कमी होत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सींग हा एकमेव प्रभावी पर्याय असून लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या विभाग पूर्णत: ‍अनिश्चीत काळासाठी बंद करण्यात येत आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 'हे' विभाग अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद

यामध्ये मासळी, मटण व चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी इ. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व ठाणे महापालिकेने तात्पुरती भाजीपाला व फळांची दुकाने, मार्केट, दूध, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बेकरी पदार्थ, मासळी, चिकन, मटण व इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा बंद करण्यात आली आहे तर दूध –डेअरी, औषधांची दुकाने अखंडपणे चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्याम होळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details