महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 11, 2021, 8:47 PM IST

Updated : May 11, 2021, 9:12 PM IST

ETV Bharat / state

ठाण्यात अंत्यविधीनंतरचे सोपस्कार पार पाडत आहेत सामाजिक कार्यकर्ते

कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या यातना अंत्यसंस्कारानंतर संपत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण, अंत्यसंस्कारानंतर होणारी दशक्रिया विधी, अस्थी विसर्जन या विधी पूर्ण करण्यासाठी मृतांचे नातेवाईक पुढे येत नाहीत. यामुळे ठाण्यातील एका अवलियाने अशांचे दशक्रिया विधी व अस्थी विसर्जन करण्याचा विढा उचलला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

ठाणे -कोरोना काळात एकाकी आयुष्य जगणाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे तर अंत्यसंस्कार विविध संस्था, महापालिकेच्या वतीने केले जाते. मात्र, कोरोनाबाबत असलेल्या गैरसमजामुळे अंत्यविधीनंतरचे सोपस्कार पार पाडायलाही नातेवाईक पुढे येत नाहीत. ही बाब खटल्याने ठाण्यातील एका अवलियाने अंत्यविधीनंतर दशक्रिया विधी, अस्थी विसर्जन करण्याचा विढा उचलला आहे.

ठाण्यात अंत्यविधी नंतरचे सोपस्कार पार पाडत आहेत सामाजिक कार्यकर्ते

ठाण्यातील वी आर फॉर यू संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक किरण नाक्ती यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 15 व्यक्तींचे अस्थी विसर्जन आणि काहींचे दशक्रिया विधी त्यांनी केले आहेत. ते म्हणाले की, अस्थीमुळेही कोरोनाची बाधा होईल या भीतीने अनेक नातेवाईक अस्थी विसर्जन व दशक्रिया विधीसाठी पुढे येत नाहीत. वी आर फॉर यू या संस्थेमार्फत किरण नाक्ती यांनी आधीच अनेक वृद्धांना जेवण, औषध, मानसिक आधार देण्याचे काम या कोरोना काळात केले आहे.

कोरोना काळातही सुरू होती मदत

मागील वर्षभरापासून किरण नाक्ती यांनी कोरोना बाधित रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे. टाळेबंदीत गरजुंना अन्न-धान्य वाटप करणे, अशीही मदत केली आहे.

हेही वाचा -भाईंदर पूर्वेतील कॅनरा बँकेला लागलेली आग आटोक्यात

Last Updated : May 11, 2021, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details