ठाणे - गेल्या आठवड्यात कल्याण-डोंबिवली शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका जसा सर्वसामान्य लोकांना बसला तसाच सापांना देखील बसला आहे. या पुरच्या पाण्यामुळे निवारा हरवलेल्या असंख्य सापांनी बचावासाठी मानवी वस्तीत आसरा घेतला होता. मात्र पुराचे पाणी ओसरताच कल्याण पश्चिम परिसरातील विविध वस्त्या, सोसायट्यांमधून या विषारी, बिन विषारी सापांना सर्पमित्रांनी पकडले आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले आहे. मागील दोन दिवसात विविध जातीच्या तब्बल 28 सापांना जीवनदान दिल्याची माहिती आहे.
मानवी वसाहतीत शिरलेल्या 28 सापांना जीवनदान - forest depatrment
पुराच्या पाण्यामुळे निवारा हरवलेल्या असंख्य सापांनी बचावासाठी मानवी वस्तीत आसरा घेतला होता. मात्र पुराचे पाणी ओसरताच कल्याण पश्चिम परिसरातील विविध वस्त्या, सोसायट्यांमधून या विषारी, बिन विषारी सापांना सर्पमित्रांनी पकडले आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याची माहिती आहे.
शुक्रवारी या सापांना कल्याण परिक्षेत्र वन विभागाचे अधिकारी एम. डी. जाधव यांच्या उपस्थितीत वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे, सुहास पवार, योगेश कांबळे, आदित्य शिंदे, प्रेम आहेर, हितेश करजगावकर सह आदी सर्पमित्रांनी निसर्गाच्या सानिध्यातील जंगलात सोडून जीवदान दिले.
जंगलात सोडण्यात आलेल्या सापांमध्ये 11 नाग, 7 विषारी घोणस, 2 मण्यार असे 20 विषारी साप तर 2 मांडूळ, 2 तस्कर आणि 4 कुकरी असे एकूण 28 विषारी - बिन विषारी सापांना जंगलात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी एम. डी. जाधव आणि वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे.