ठाणे- पावसाळ्याच्या दिवसात विषारी-बिनविषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यातच एका नागिणीने १२ पिलांना तर विषारी घोणस मादीने २४ पिलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.
पहिल्या घटनेत कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव परिसरात राहणारे मिलिंद पाटील यांच्या घराच्या लगत सोमवारी रात्रीच्या सुमाराला एका नागिणीने १२ अंडे देऊन ती त्या ठिकाणावरुन निघून गेली. त्यानंतर पाटील यांना घरालगत ही अंडी दिसल्याने त्यांनी तत्काळ सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश यांना संपर्क करून नागिणने अंडी घातल्याची माहिती दिली. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचून अंडी सुरक्षित अग्निशमन दलाच्या कार्यालयात एका खोलीत काचेच्या पेटीत ठेवले. तर या अंड्यांतून आज (मंगळवार) सकाळच्या सुमाराला तब्बल बारा पिले जन्माला आली आहे.