महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावभाजी सेंटरमध्ये घुसला साप; ग्राहकांनी ठोकली धूम

एका पाव भाजी सेंटरमध्ये भला मोठा साप घुसल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौकातील बिरजू पाव भाजी सेंटर मध्ये घडली. दुकानात साप पाहताच कर्मचारी आणि ग्राहकांनी धूम ठोकली.

साप पकडताना सर्पमित्र

By

Published : Jul 9, 2019, 7:26 PM IST

ठाणे - एका पाव भाजी सेंटरमध्ये भलामोठा साप घुसल्याने ग्राहकांनी पावभाजीचा अस्वाद न घेताच पळ काढल्याची घटना घडली. ही घटना कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौकातील बिरजू पाव भाजी सेंटरमध्ये घडली.

साप पकडताना सर्पमित्र


कल्याण डोंबिवलीत संततधार पावसामुळे सखल भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना घडत आहे. त्यातच सापांच्या बिळात पाणी शिरल्याने विषारी व बिनविषारी सापांनी भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरल्याने पंधरा दिवसात तब्बल ५० पेक्षा अधिक साप मानवी वस्तीतून सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडले आहे. असाच एक साप काल (सोमवारी) सायंकाळी भक्ष्य शोधण्यासाठी दुर्गाडी चौकातील प्रसिद्ध बिरजू पावभाजी सेंटरमध्ये घुसला होता. त्यावेळी काही ग्राहक पावभाजीचा आस्वाद घेण्यासाठी सेंटरमध्ये बसले होते. तर त्यांच्यासाठी सेंटरमधील कारागिरी पाव भाजी बनवत होते. पावभाजी बनवत असताना अचानक हा भला मोठा साप पावभाजी बनवण्याचे काम करणाऱ्या कारागिराला दिसला सापाला बघताच तिथून त्याने पळ काढला. त्याला पळताना बघून ग्राहकांनी पावभाजीचा अस्वाद न घेताच प्लेट सेंटरमध्ये धूम ठोकली.


पावभाजी सेंटरमध्ये साप घुसल्याची माहिती सर्पमित्र हितेश याला मिळताच त्याने घटनास्थळी येवून हा साप पकडला. साप पकडल्याचे पाहून सेंटरच्या मालकासह ग्राहकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून साडे पाच फूट लांबीचा आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सापाला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details