ठाणे : ऑटो रिक्षातून १५ किलो गांजाची तस्करी ( Cannabis Smuggling By Auto Rikshaw ) करून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तस्कराला भिवंडी गुन्हे शाखेच्या ( Bhiwandi Crime Branch ) पोलिसांनी सापळा रचून अटक केली ( Cannabis Smuggler Arrested ) आहे. दुर्गा राजेंद्र साह (वय ४७ रा. रांजणोली, भिवंडी ) असे अटक तस्कराचे नाव आहे.
२ लाख ४१ हजार ५३० रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत :भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडुन याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने भिवंडी तालुक्यातील रांजणोली गांव, ते कमानीचे रोडवर एका अॅटो रिक्षातुन प्रवासी म्हणून एक तस्कर गांजा हा अमली पदार्थ विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे बुधवारी रात्रीच्या सुमारास रांजणोली नाका परिसरात सापळा रचून तस्कर दुर्गा राजेंद्र साह याला रिक्षातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून दोन निळया रंगांच्या प्लास्टिक पिशव्यांमधून एकुण वजन १५ किलो ३६ कि.ग्रॅम वजनाचा २ लाख ३० हजार ४०० रु किमतीचा मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा हा अमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४१ हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.